बातम्या / लेख

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-२०२५ : काय करावे व काय करु नये

दिनांक : 15 सप्टेंबर 2025

चालू असलेले कार्यक्रम / योजना पुढे सुरु ठेवता येतील. शंका असल्यास राज्य निवडणूक आयोग किंवा संबंधित प्राधिकाऱ्यांची मान्यता घ्यावी.

पूर, अवर्षण, साथीचे रोग किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या क्षेत्रात साहाय्यकारी उपाययोजना चालू ठेवता येतील.

निवडणूक सभा, मिरवणुका, ध्वनिक्षेपक वापर, वाहतूक नियम, मतदान कक्षातील प्रवेश नियम यांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.

निवडणूक प्रक्रियेत शांतता, सुव्यवस्था व कायद्याचे पालन करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.